अवैधरीत्या जुगार खेळणाऱ्या 13 जणांवर देवरी पोलिसांची धडक कारवाई

5 दुचाकीसह एकूण 1 लाख 61 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त

माननीय पोलीस अधीक्षक साहेब गोंदिया यांचे आदेशान्वये तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब गोंदिया कॅम्प देवरी व माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी साहेब देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या वर आळा घालण्यासाठी पोलिस स्टेशन देवरी अंतर्गत दि 8/5/2021 रोजी खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली.

ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे पोलीस स्टेशन देवरी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काही लोक देवरी बीडमध्ये मौजा भागी शेतशिवारात तासपत्ती वर हारजितीचा खेळ खेळत आहेत अशी माहिती मिळाल्याचे पोलीस स्टाफ नी जाऊन रेट घातली असता त्यात जमिनीच्या फळावर नगदी तीन हजार रुपये मिळून आले आरोपी नामे अनिल निलकंठ मेश्राम यांचेकडून नगदी 6400/- रुपये व मोटार सायकल MH 35 U 5366 किंमत 30000/- रु. , दिनेश भगतसिंग चव्हाण यांचे कडून नगदी पाचशे रुपये 52 तास पत्ते व मोटरसायकल क्रमांक CG -09-ए -0441 हिरो होंडा स्प्लेंडर प्लस किंमत अंदाजे 10 हजार रुपये असा मुद्देमाल मिळून आला तसेच मोक्यावर घटने ठिकाणी पळून गेलेल्या इसमाच्या मोटरसायकल क्रमांक MH 35 2938 टीव्हीएस आपाची कंपनीची किंमत अंदाजे 50 हजार रुपये , मोटर सायकल MH35 डब्ल्यू 6703 स्प्लेंडर प्रो हिरो होंडा कंपनी अंदाजित किंमत 30 हजार रुपये मोटरसायकल क्रमांक MH 35 डब्ल्यू 0656 बजाज डिस्कवर कंपनीची अंदाजी किंमत 25 हजार रुपये असा एकूण 1 लाख 59 हजार 900 रुपयाच्या माल पंचासमक्ष मोक्यावर जप्त करण्यात आला.

घटनास्थळावरून आरोपी नामे योगेश तुकाराम वाघमारे 35 वर्षे राहणार वार्ड क्रमांक 10 देवरी , हेमंत मडावी वय 33 वर्षे राहणार देवरी , धनराज घासले व 35 वर्षे राहणार मुल्ला , आव्हाड गुरुजी वय 29 वर्षे राहणार पंचशील चौक देवरी हे पळून गेले आहेत सदर सहाही आरोपी वर अपराध क्रमांक 119/2021 कलम 188 ,259 , 270 भा द वि सहकलम 2-3 साथरोग प्रतिबंध अधिनियम आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम 51 कलम 12 (अ ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तसेच दुसऱ्या कारवाईमध्ये मौजे देवरी पटाची दाना शिवारात ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस स्टाफने रेड घातली असता फळावर पंधराशे रुपये नगदी आरोपीचे नाव संदीप सोहम शेंडे , दिलीप गेडाम यांचे कडून 52 तास पत्ते व नगदी बाराशे रुपये असा सत्तावीसशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच मोक्यावर घटनास्थळी आरोपी अक्षय कोचे , रोहित साखरे , राकेश चव्हाण , रोशन भगवा , गोलू सय्यद सर्व राहणार देवरी ते पळून गेले सदर सातही आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक 120/2021 कलम 188 269 270 भादवि सहकलम 2 3 साथरोग प्रतिबंध अधिनियम , आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम 51 कलम 12 (अ )गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दोन्ही कारवाईमध्ये एकूण 1 लाख 61 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे पोलीस स्टेशन देवरी, नापोशी ग्यानीराम करंजेकर , ना पो शि शिवराज परसमोडे , पोलीस शिपाई दिलीप हातझाडे , पोलीस शिपाई रोशन डोहळे , पोलीस शिपाई हंसराज भांडारकर , पोलीस शिपाई गुणेश्वर नेवारे , चालक पोलीस हवालदार ग्यानिराम राऊत , पोलीस हवालदार अंताराम बोहरे , पोलीस शिपाई चुळीराम शेंडे यांनी कारवाई केली.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें