कोरोना रुग्णांच्या सेवेत नगर पंचायत सज्ज

अहोरात्र कोरोना योद्धे करतात धार्मिक रुढीने अंत्यसंस्कार

प्रतिनिधी / सालेकसा

कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे कळताच मनात एक वेगळीच धाक निर्माण होते. अशा परिस्थितीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या जवळ जाण्याची कोणीही हिम्मत करत नाही. जरी ती व्यक्ती आपले खास, जिवलग, नात्यातली असली तरीही मनात मात्र विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची दाट भीती असते की त्या शवाजवळ जाण्याची कोणी हिम्मत करत नाही. मग अशा वेळेस धार्मिक रूढीनुसार अंत्यसंस्कार करणे म्हणजे मोठे धाडसाचेच काम. असा धाडसीचा काम सध्या नगरपंचायत सालेकसा चे कर्मचारी करताना दिसत आहेत. सालेकसा तालुक्यातील कोरोनामुळे बळी गेलेल्या प्रत्येक नागरिकांना धार्मिक रूढी परंपरा नुसार अंत्यसंस्कार करण्याचे कार्य नगरपंचायत सालेकसा च्या माध्यमातून केले जात आहेत. यासाठी आमगाव खुर्द येथील मोक्षधाम ची निवड करण्यात आली आहे. नगरपंचायतीचे कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्मशानभूमीत कोरोना बाबत मृतदेहांवर त्यांच्या धर्मानुसार अंत्यविधी करण्याचे पवित्र काम करीत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अत्यंत गंभीर असून सालेकसा सारख्या ठिकाणीही सुद्धा कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी सालेकसा नगर पंचायतीच्या माध्यमातून युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. रात्री-बेरात्री तालुक्यातून कुठूनही कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे कळताच नगरपंचायतीचे माध्यमातून त्या मृतदेहाचं अंत्यविधीचे कार्य केले जात आहे. वन विकास महामंडळाच्या आजारातून लाकडं आणण्यापासून तर मृतदेहाची शरण रचणे तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या हस्ते दहन करणे पर्यंत सर्व कार्य रूढी परंपरेने केले जात आहे. यासाठी आवश्यक ते उपाय योजना सुद्धा केले जात आहेत. ज्यात निर्जंतुकीकरण, पीपीई किट, सामाजिक अंतर असे सर्व बाबींचा काटेकोरपणे पालन केले जात आहे.

अंत्यविधीसाठी विशेष पथकाची नेमणूक

अंत्यविधीसाठी विशेष पथकाची नेमणूक केली असून या पथकाचे पर्यवेक्षक म्हणून भिमराम भास्कर यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर या पथकात अनिल नेवारे, कुवर साखरे, रवी मानकर, मनिष शेंद्रे, रवी नेवारे, ओम प्रकाश मानकर, इत्यादी मंडळींचा समावेश आहे. या पथकावर निरीक्षण व मार्गदर्शन करणाऱ्या शासकीय चमूमध्ये अजय वाघमारे, अक्षय पटले, संदीप लहाने, कमलेश टेंभुर्णीकर, संतोष गभणे इत्यादी नगरपंचायत सालेकसाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कोरोना वॉरियर्सला विमाचे सुरक्षाकवच

नगरपंचायत सालेकसा च्या माध्यमाने कार्यरत असणाऱ्या सर्व सफाई कामगाराच्या कामाचे पाईक म्हणून त्यांना जीवन विमा सुद्धा करण्यात आलेला आहे. कोरोना काळात त्यांच्या अशा कार्याला जीवन विमा ची जोड अत्यंत आवश्यक असून यासाठी सर्व सफाई कामगारांचे त्यांचे कामाचे स्वरुप बघता सुरक्षाकवच देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सालेकसा च्या वतीने करण्यात आली होती त्यावर कंत्राटदाराकडून सर्व सफाई कामगारांचे जीवन बीमा करून घेण्याचे कार्य नगरपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. स्मशानभूमीत अहोरात्र काम करणाऱ्या या सर्व कोरोना वॉरियर्सला जणू विमाचा सुरक्षाकवच नगरपंचायतीने दिला आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

Share