योग्य वेळी कोरोना चाचणी करून आपल्या कुटुंबाला सुरक्षित करा- दीपक पवार (माजी जि.प. सदस्य )

?दीपक पवार यांच्या पुढाकाराने सुरतोली गावात 40 लोकांचे कोरोना चाचण्या

?ग्रामीण भागातील कोरोना चाचणीची भीती घालविण्यासाठी स्वतः पासून सुरु केली चाचणी , सर्व चाचण्या निगेटिव्ह

डॉ. सुजीत टेटे प्रहार टाईम्स /देवरी 04: राज्यात वाढते कोरोनाचे संक्रमण बघता गावागावात कोरोना जनजागृती आणि कोरोना चाचणी ला आरोग्य विभागाद्वारे सुरुवात करण्यात आली . नुकतेच देवरी तालुक्यातील सुरतोली गावात कोरोना चाचणी चा कॅम्प लावण्यात आला परंतु भीतीमुळे ग्रामीण भागातील लोक कोरोना चाचणी करीत नसून त्यांना मोठे लक्षणे वाढल्यास मृत्यूला सामोरे जावे लागते. हि बाब दीपक पवार माजी जिप सदस्य गोंदिया यांच्या लक्षात येताच गावातील कोरोना चाचणी कॅम्पला प्रतिसाद नसल्याचे बघून स्वतः आपल्या कुटुंबासोबत कोरोना चाचणी करून घेतली आणि गावातील जनतेला चाचणी करण्यास प्रवृत्त केले त्यामुळे 40 लोकांची चाचणी करण्यात आरोग्य विभागाला यश आले.

जास्तीत जास्त चाचण्या करून योग्य वेळी कोविड रुग्णाला औषोधोपचार मिळाल्यास कोरोनावर मात करता येते त्यामुळे दीपक पवार यांच्या शब्दाला मान देऊन गावात कोरोना चाचणी कॅम्पला उत्तम प्रतिसाद मिळाला .यावेळी पवार कुटुंबातील सर्व सदस्य , गावातील नागरिक उपस्थित होते .

सदर कोरोना चाचणी कॅम्प चे आयोजन आरोग्य विभागा द्वारे करण्यात आले असून डॉ. लाडे आणि त्यांच्या चमूच्या सहकार्याने 40 चाचण्या करण्यात आल्या असून सर्वांचे नमुने निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले .

“कोरोना चाचणी करून आपल्या कुटूंबाला सुरक्षित करा . लक्षणे असल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्राला भेट द्या . कोरोना लसीकरण करून घ्या आणि आपले आरोग्य व कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवा”

– दीपक पवार (मा . जिप सदस्य गोंदिया )

Print Friendly, PDF & Email
Share