देसाईगंज-वळसा शहरातील 2 अवैद्य कोविड हॉस्पिटल्सला सील

देसाईगंज तालुका प्रशासनाची कारवाई : साळे भाटो दोघानीही रुग्णांना लाखोनी गंडविले

देसाईगंज 2: येथील कब्रस्थान रोडवरील अर्ध सैनिक कॅंटीन समोरील डॉ. मनोज बुद्धे यांचे बुद्धे हास्पीटल आणि गांधीवार्डातील डॉ. श्रीकांत बनसोड यांच्या बनसोड हास्पिटलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरीत्या कोविड रुग्णांच्या असहायतेचा फायदा उचलत त्यांना लाखोने गंडविण्याचा गोरखधंदा जोमात सुरू होता. अशी गोपनीय माहिती तालुका प्रशासनाला मिळताच तालुका प्रशासनाने तत्काल हालचाल करून दोन्ही रुग्णालयात भरती असलेल्या पाच पाच रुग्णांना शासकीय कोविड केअर सेंटरला दाखल करीत या दोन्ही हॉस्पीटल्सना टाळे ठोकल्याचे सांगितले जात आहे.

बुद्धे हॉस्पीटलचे संचालक डॉ मनोज बुद्धे आणि बनसोड हॉस्पीटलचे संचालक डॉ श्रीकांत बनसोड हे नात्याने सगेसोयरे अशून या दोघांनी संगनमताने गेल्या लॉकडाऊन पासून आता पर्यंत कोरोणा विषाणूने संसर्ग झालेल्या रुग्णांकडून जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नसतांना देखील भर्ती करुन लाखो रुपयाचे बिल लाटून जबर कमाई केल्याचे सांगितले जात आहे. या दोघांचेही हॉस्पीटल देसाईगंज तालुका प्रशासनाने सिल केले असले तरी या दोन्ही हॉस्पीटल वर अद्यापही गुन्हे दाखल करण्यात आले नाही. परंतु. उद्या गुन्हे दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.


सदर कारवाई देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांच्या माग॔दश॔नात तहसीलदार संतोष महले, मुख्याधिकारी डाॅ.कुलभुषण रामटेके, पोलिस निरीक्षक डाॅ.विशाल जयस्वाल, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक कुंमरे व आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत करण्यात आली.पुढील तपास उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांच्या मार्गदर्शनात संबंधित विभागाचे अधिकारी करीत आहेत.

त्या हॉस्पीटलने सगळ्या रुग्णांना केले डिस्चार्ज

देसाईगंज शहरातील ब्रम्हपुरी रोडवरील गांधीवाॅर्डातील पुन्हा एका हॉस्पीटल मध्ये सौम्य कोविड रुग्ण भर्ती होते. परंतु, तालुका प्रशासनाने दोन हॉस्पीटल सिल केल्याची माहिती मिळताच धाबे दणाणलेल्या डॉक्टरने सगळ्या रुग्णांना डिस्चार्ज करुन टाकले. कोविड केअर हॉस्पीटलची मान्यता नसतांना या हॉस्पीटल ला संलग्नित फॉर्मशीतील रेमडीसिवीर इंजेक्शन व फॅबिफ्यु औषधी साठा व पॅथालॉजी लॅब मधील रॅपिड अँटीजन टेस्ट किटस् चा साठा याची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक असून अवैद्यरीत्या कोविड केअर हॉस्पीटल कशाच्या आधारावर लाखो रुपयाचे बिल काढले जात होते व किती रुग्ण दगावले याची चौकशी होणे गरजेचे आहे.

Print Friendly, PDF & Email
Share