आ. कोरोटे यांनी घेतली खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक
देवरी 30: तालुका कृषी कार्यालय देवरी येथे २०२१-२२ करिता कृषि विभागाची खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक पार पडली.
यावेळी सर्व विभाग प्रमुखांनी २०२१-२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या फळबाग शेती,भाजीपाला शेती, भात शेती , मनरेगा तर्फे घेण्यात येणारे कामाची माहिती तालुका कृषिअधिकाऱ्याने दिली.राबविलेल्या सर्व योजनेचा पाठपुरावा करावा व फळबाग शेतीला प्राधान्य देने गरजेचे आहे, कृषी कार्यालया तर्फे आयोजित योजनेचा जनजागृती जास्तीत जास्त करा व आपण प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या शेतात जाऊन प्रशिक्षण दया अशा सूचना आमदार सहषराम कोरोटे यांनी केल्या.
याप्रसंगी संदीपजी भाटिया अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी देवरी, मंगेश वावधने उपविभागीय कृषी अधिकारी देवरी, जी.जी. तोडसाम कृषि अधिकारी देवरी, सर्व तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.