खा.अशोक नेते यांनी दिली देवरी कोविड सेंटर ला भेट
देवरी CCC ला 1मिनी व्हेंटिलेटर भेट
डॉ. सुजित टेटे
देवरी 26: राज्यात आणि देशात कोरोनाचे वाढते प्रमाण बघता आपल्या लोकसभा क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचा दौरा केला.
कोरोनाचे वाढते रुग्ण बघता क्षेत्रातील आरोग्य विषयक सोयी सुविधांची माहिती जाणून घेतली असून आपल्या निधीतून देवरी कोविड केंद्राला 1 मिनी व्हेंटिलेटर भेट दिले असून देवरी तालुक्यातील रुग्णांना ते उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी डॉ. ललित कुकडे यांनी मेडिकल स्टाफ आणि डॉक्टर्स यांची देवरी तालुक्यात कमी असून त्यांची जागा तात्काळ भरावी अशी मागणी खा. अशोक नेते यांना केली.त्याचबरोबर राजेश चांदेवार यांनी तालुक्यातील नर्सिंग कॉलेज च्या विद्यार्थ्यांना कोवीड केंद्रात मानधन तत्वावर सेवा देण्यास मुभा द्यावी अशी मागणी यावेळी केली.
यावेळी देवरी कोविड केंद्रात खा. अशोक नेते, झामसिंग येरणे, प्रवीण दहिकर, अनिल येरणे , राजेश चांदेवार, अन्नू शेख, संजय दरवडे बंटी भाटिया यांच्या सह नोडल अधिकारी डॉ. ललित कुकडे, डॉ. दिक्षा पारधी, नम्रता मंगले, डिलेश्वरी भाजीपाले आदी कोविड केंद्राची वैद्यकीय चमू उपस्थित होती.