आमदार कोरोटे यांच्याकडून आपल्या विकास निधितून आरोग्य विभागाच्या बळकरी करिता १ करोड़ निधिची घोषणा
देवरी 23; आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्रातील देवरी, आमगांव व सालेकसा तालुक्यात कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग पाहुन या विरुद्ध लढण्या करिता आमदार सहषराम कोरोटे यांनी आपल्या स्थानिक विकास निधितून एक करोड रूपयाची निधी देण्याची घोषणा देवरी येथे ग्रामीण रुग्णालयात कोरोना विषयी बुधवारी(ता.२२ एप्रिल) रोजी आयोजित आढावा बैठकीत केली. या निधितून देवरी, आमगांव व सालेकसा तालुक्यातील वैद्यकीय सेवेतील आरोग्य साहित्या करिता मदत होणार आहे.
या आढावा बैठकीत देवरी तालुक्यातील देवरी व चिचगड ग्रामीण रुग्णालय आणि सर्व प्राथमिक आरोग्य केन्द्रातील वैद्यकीय सेवे बाबद आमदार कोरोटे यांनी चर्चा करुण आढावा घेतला. आणि उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, कोरोना विषाणु संसर्गाचा वाढता प्रमाण पाहता आपन आपली जबाबदारी ईमानदारी ने पार पाडण्याची गरज आहे. कारण या क्षेत्रातिल लोक आपल्याला देवाच्या भूमिकेत समझून आपल्यावर विश्वास ठेवतात. आपन त्यांच्या विश्वासाला तळा देवू नए. आपल्या लोकांच्या आरोग्य सेवेसाठी ज्या ज्या साहित्याची गरज आहे. त्या साहित्याची पूर्वता मी आपल्या विकास निधितून करणार आहे. या करिता मी आपल्या विधानसभा क्षेत्रातील देवरी, आमगांव व सालेकसा तालुक्यातील आरोग्य सेवा बळकर करण्याकरिता एक करोड़ रूपयाची निधि देत आहे. या निधितून तिन्ही तालुक्यात वैद्यकीय साहित्य यात ऑक्सीजन सिलेंडर, वाईटॉप मशीन, वाईटल माँन्टोर, एलीवेटर बेड अशाप्रकारचे साहित्य उपलब्ध होणार आहे.
या आढावा बैठकीत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप भाटिया, ग्रामीण रुग्णालय देवरीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गुल्हाने, डॉ. गजभीये, देवरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे, कमलेश पालीवाल, पत्रकार नंदुप्रसाद शर्मा आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
आमदार सहषराम कोरोटे यांनी आपल्या विकास निधितून आरोग्य सेवा बळकर करन्याकरिता एक करोड़ रूपयाची निधि दिल्याबद्दल क्षेत्रातील लोकानी आमदार कोरोटे यांचे आभार मानले आहे.