5 वर्षीय गुनगुनचा मधमाश्यांच्या हल्ल्यात मृत्यू , तर दोन महिला गंभीर

सालेकसा/ तिरखेड़ी येथील दुःखद घटना

महेश कावळे / तालुका प्रतिनिधी

सालेकसा २३: तालुक्यातील तिरखेडी येथे मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात एका पाच वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला तर दोन महिला जखमी झाल्याची दुःखद घटना दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. मृतक बालिकेचे नाव गुनगुन राजेश कटरे असून लता ठाकरे (२२) व लछमाबाई ठाकरे (४५) अशी जखमी झालेल्यांची नाव आहेत.

कु. गुनगुण कटरे ही आमगाव तालुक्यातील रामाटोला येथील रहिवासी असून तिचे आई-वडील नागपूर येथे रोजगारी चे काम करतात . त्यामुळे गुनगुणला त्यांनी मावशीकडे कुलरभट्टी येथे ठेवले होते. दि २० ऑक्टोबर रोजी लता ठाकरे सोबत गुनगुन आपल्या आजीच्या गावी तिरखेडी येथे जात असताना तिची आजी रस्त्यालगत शेतात काम करताना दिसली. त्यामुळे या दोघी शेताजवळ थांबल्या. आजी लछमाबाई ठाकरे यांच्यासोबतच त्यांच्या घरी जाण्याची वाट बघत असताना अचानक मधमाशांना थवा आला आणि तिघींवर जोरदार हल्ला केला.

बालिका गुणगुनची मावशी लता ठाकरे आणि आजी लछमा ठाकरे यांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी नजीकच्या नाल्याच्या पाण्यात उडी घेतली परंतू गुनगुन स्वतःला वाचविण्यासाठी काही करु शकली नाही. त्यामुळे मध माश्यां तिच्यावरच भिडले. काही वेळात तिरखेडी येथील लोकांनी घटनास्थळ गाठून कुटुंबीयांच्या मदतीने तिघांना सालेकसा येथील ग्रामीण रूग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी गुनगुनची तपासणी करुन तिला मृत घोषित केले. तर मावशी आणि आजी दोघे गंभीर जखमी असून त्यांना गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेबाबत पोलीस स्टेशनशीसंपर्क केला असता कळले की परिवारातील लोकांनी मर्ग दाखल करण्यास नकार दिल्याचे कळले आहे.

Share