जुगार खेळणार्‍यावर देवरी पोलिसांची धडक कार्यवाही

डॉ. सुजित टेटे

देवरी 18- पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात दि- 17 एप्रिल रोजी अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी देवरी येथे कर्तव्यवर हजार असतांना गोपनीय सुरता कडून खात्रीशीर माहिती मिळताच पोलिस ठाणे देवरी हद्दीतील शेडेपर शेतशिवारात व मरामजोब शिवारात सर्रास अवैध रित्या तासपट्टी वरील पैशाचा हरजितीचा खेळ व जुगार सुरू असल्याची माहिती प्राप्त होताच अप्पर पोलिस अधीक्षक यांनी आपल्या स्टाफ ल सादर ठिकाणी रवाना करून सापळा रचून 5.30वाजता दरम्यान उमेश देवीलाल शाहू , कवरदिनसिंग जसविंदरसिंघ भाटिया , अविनाश ढवळे , रोशन बागवा , यांना तासपट्टी वर जुगार खेळतांना पकडले . एसआरव्ही आरोपींना ताब्यात घेतले असून अंगझडतीत जुगार साहित्य , 2 मोबाइल व नगदी 43910/- रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर प्रकरणी पोलिस हवालदार 889 परमानंद नंदागवळी अप्पर पोलिस अधिकारी कार्यालय देवरी यांच्या तक्रारी वरुण पोलिस स्टेशन देवरी येथे अपराध क्रमांक 93/2021 कलम 12 (अ) म.जू. का . अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हाचा तपस पोहवा 1196 हीवराज परसमोडे करीत आहेत .

दुसरी कारवाई मरामजोब जुडपी जंगल परिसरात सापळा रचुन 6.30 वा. दरम्यान आरोपी १) रामेश्वर चरणनदास नागदेवे २) चंदु सुदाम मेश्राम ३)जवुिदरसिंग भाटीया ४)प्रफुल सुधाकर राऊत ५) मनोज अनुर्ध बडोले ६) संदिप बसिन कुंडे ७) विकास ईश्वरदास शहारे यांना तास पत्यावर जुगार खेळतांनी पकडले. त्यांचे अंगझडतीत १) ७ मोबाईल मिळून आले. व घटनास्थळावर ५ मोटार सायकल व जुगाराचे साहीत्य व रोख रक्कम असा एकुण ३,६४,६५०/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन वरील आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सदर प्रकरणी पो.ना.संदिप खडसे बनं. ३८५ अपर पोलीस अधिक्षक कार्यालय देवरी यांचे तक्रारी वरुन पोलीस स्टेशन देवरी येथे अपराध क्रमांक ९४/२०२१ कलम १२ अ म.जु.का. अन्वये आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोहवा/११५४ गॅनिराम करंजेकर, पोलीस स्टेशन देवरी हे करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share