जिल्हाधिकाऱ्यांनी सोपविली विविध अधिकाऱ्यांवर महत्वाची जबाबदारी…

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे सह जिल्ह्यातील सर्व वर्ग 1 व 2 चे अधिकारी कर्मचारी समाविष्ट

जिल्हाधिकारी दीपककुमार मीना

डॉ. सुजित टेटे |मुख्य संपादक

गोंदिया 17: दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतांना दिसून येत आहे त्यामुळे दररोज 500 च्या वर कोरोना रूग्णांची भर जिल्ह्यात पडत आहे. शासकीय तथा खाजगी रुग्णालये पूर्ण भरलेले असून रुग्णांना बेड उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजन चा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. दररोज रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. नुकतीच नवनियुक्त पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाला कोरोना प्रतिबंधक योजनांसाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी दिपककुमार मीना यांनी जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे सह सर्व वर्ग 1 व 2 चे अधिकारी व कर्मचारी यांना विविध प्रकारचे कामे वाटप केल्याचे आदेश निर्गमित केले आहे. सर्वांना दिलेल्या जबाबदारी नुसार कार्याचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास देण्याचे सुचविले आहे.

अकोल्याचे तहसीलदार सह पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

जिल्हाधिकारी यांचे आदेश-

Print Friendly, PDF & Email
Share