जिल्ह्यात पावसाची शक्यता : शेतकऱ्यांनी पिक सुरक्षित ठिकाणी ताडपत्रीने झाकुन ठेवावे – गणेश घोरेपडे

गोंदिया 9: जिल्ह्यात दिनांक ० ९ ते ११ एप्रिल २०२१ या कालावधीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे . ज्या रबी पिकांची काढणी झाली आहे परंतु मळणी झालेली नाही , त्याची त्वरीत मळणी करावी . मळणी होऊ न शकल्यास असे काढणी केलेले पिक सुरक्षित ठिकाणी ताडपत्रीने झाकुन ठेवावे असे आव्हान जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गोंदिया गणेश घोरेपडे यांनी केले आहे. तसेच ज्या ठिकाणी खरीप हंगामातील उत्पादीत झालेला धान उघड्यावर असेल तो पावसाने भिजण्याची शक्यता असल्याने त्याला त्वरीत ताडपत्रीचे आच्छादन करावे . अवकाळी पावसानंतर दमट हवामान तयार होत असल्यामुळे उन्हाळी पिकांवर किड – रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो . त्यासाठी नियंत्रणात्मक उपाययोजना कराव्यात असे ही आव्हान केले आहे.

Share