गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय अभ्यांगतासाठी बंद
प्रहार टाईम्स| भुपेंद्र मस्के
गोंदिया: जिल्हाधिकारी कार्यालय अभ्यांगताच्या भेटीसाठी बंद करण्यात आले असुन कार्यालयाच्या आतमध्ये येण्यासाठी मनाई करण्यात आल्याचा आदेश आज जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी काढले.
नागरिकांनी अत्यंत तातडीचा पत्रव्यवहार इ-मेल द्वारे करण्याचे आवाहन
राज्य शासनाने कोरोना विषाणु (कोविड -19) या साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय बंद करण्यात आले आहेत. या काळात अत्यंत तातडीचा करावयाचा पत्रव्यव्हार ( टपाल ) नागरिकांनी ई-मेलव्दारे सबंधित विभागास करावा असे जिल्हाधिकारी प्रशासनाने कळविले आहे.
जिल्हा प्रशासन यांच्याकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, दैनंदिन व वैयक्तीक कामासाठी लोकप्रतिनिधी, नागरीक तसेच अन्य सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, समाजसेवक,ठेकेदार यांची मुख्य कार्यालयात मोठया प्रमाणात वर्दळ होत असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कार्यालयात प्रवेश बंद करण्यात आला आहे.
परंतू नागरिकांची कोणत्याही स्वरुपात गैरसोय होऊ नये यासाठी इमेलद्वारे पत्रव्यवहार करता येईल. त्यासाठी संबंधित कार्यालयाचे ई-मेल आयडी [email protected] व [email protected] या मेलवर पाठविण्यात यावे. या काळात नागरिकांचे कामे प्रलंबित राहणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.
नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले आहे.