मिनी लॉकडाऊन : व्यापारी नागरिकांमध्ये संभ्रम

जीवनावश्यक वस्तू दुकानदार खुश तर इतर व्यापारी व छोटे दुकानदार निराश

डॉ. सुजित टेटे

देवरी 6: महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे थैमान वाढतांना बघून
राज्य शासनाने जाहीर केलेल्या ब्रेक द चेन अंतर्गत जिल्ह्यात आजपासून ३० एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू असून यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी दीपक कुमार मिना यांनी 5 एप्रिल ला हा आदेश गोंदिया जिल्ह्यासाठी लागू केला.

मिनी लॉकडाऊन शुक्रवार ला रात्री 8वाजता पासून सोमवारला सकाळ 7 वाजे पर्यंत असेल अशी चर्चा सुरु असतांना आज अचानक जीवनावशक्य सोडून सर्व व्यापारी दुकाने बंद झाल्याने व्यापारी निराश झाल्याचे चित्र दिसून आले .

एकंदरीत ‘कही ख़ुशी कही गम ‘ अशी परिस्थिती बघावयास मिळाली . छोटे व्यापारी शासनाच्या निर्णयामुळे आक्रोश व्यक्त करतांना दिसले .

सकाळी दुकानदारांमध्ये काय सुरु काय बंद असा भ्रम होता दुपारी नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व बाजार बंद करण्यात आले . यामध्ये छोटे दुकानदार 30 एप्रिल पर्यंत आपले व्यवसाय कसे चालवायचे याच्या चिंतेत दिसले त्यातच कोरोना ची भीती आणि आर्थिकस्थिती याची चिंता सर्वीकडे बघावयास मिळाली .

Print Friendly, PDF & Email
Share