अवैद्य दारु विक्रेत्यांवर कारवाई सुरुच, देवरी पोलीसांची धड़क कारवाई

डॉ. सुजित टेटे

देवरी ३१: विश्व पानसरे, पोलीस अधिक्षक गोंदिया यांनी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने दि. ३०/०३/२०२१ रोजी रेवचंद सिंगनजुडे, ठाणेदार पोलीस स्टेशन देवरी हे आपले पो.स्टॉपसह देवरी पो.स्टे. हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली की, मौजा देवरी कडुन एक दुचारी वाहनावर देशी दारु वाहतुक करीत आहे. अशी माहीती मिळाल्याने मौजा मरामजोब येथे एक इसम आपले ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवित असतांना त्यास थांबण्याचा इसारा देऊन त्यांचे नाव, गांव विचारुन त्यांचे वाहनाची झडती घेतील असता त्याचे वाहनाचे मागे दोन थैल्यात अवैद्य दारु वाहतुक करतांना १८ नग देशी दारुचे पव्वे किमती ९३६/- रु. व वाहन क्र. एम.एच.३५ए.के. ९२५८ किमती २०,०००/-रु चा माल एकुण किमती २०,९३६/-रु चा माल‌ मिळुन आल्याने आरोपी हेमराज पटकुराज नेताम वय ४० वर्ष, रा. पितांबरटोला यांचेविरुध्द पोलीस स्टेशन देवरी येथे अपराध क्र. ८०/२०२१ कलम ६५(ई) महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तसेच होमदेव शंकर गि-हेपुंजे वय ४९ वर्ष. रा. मुरदोली हा आपले पानठेल्यात अवैद्य दारु विक्री करतो अशा माहीतीवरुन पानठेल्याची दारु बाबत झडती घेतली असता, ढाबामध्ये १७ नग देशी दारुचे किमती ८८४ /- रु. चा माल मिळुन आल्याने होमदेव शंकर गि-हेपुंजे वय ४९ वर्ष. रा. मुरदोली यांचेविरुध्द यांचेविरुध्द पोलीस स्टेशन देवरी येथे अपराध क्र. ८१/२०२१ कलम ६५(ई),७७(अ) महाराष्ट्र दारुबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोना. परसमोडे हे करीत आहेत.

सदरची ककारवाई विश्व पानसरे, पोलीस अधिक्षक गोंदिया, जालधर नालकुल, उपविभागीय पोलीस अधिकारी आमगांव, अति.कार्य, देवरी यांचे मार्गदर्शनात पोनि. रेवचंद सिंगनजुडे, पोउपनि. उरकुडे, पोना. उईके, पोना. बोहरे, पोशि. भांडारकर, पोशि. बोपचे, पोशि. चव्हाण यांनी केली आहे.

Share