तिन्ही कृषि काळा कायदा रद्द करा तसेच ईंधन दरवाढिच्या विरोधात काँग्रेस चे एकदिवसीय उपोषण व धरणे आंदोलन

देवरी तालुका काँग्रेस पक्षातर्फे उपोषण व धरणे

देवरी, ता.२६: केन्द्रातील मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात पारित केलेले तिन्ही कृषि कायदे रद्द करा आणि सतत वाढनारी पेट्रोल, डिझेल व घरगुती गैस च्या किंमती कमी करा तसेच देशातील कामगारांच्या विरोधात पारित केलेले काळे कायदे मागे घ्या या मागनीला धरून आज शुक्रवारी(ता.२६ मार्च ) रोजी येथील तहसील कार्यलयासमोर देवरी तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने आणि आमदार सहषराम कोरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय उपोषण व धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.


या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे देवरी तालुकाध्यक्ष संदीप भाटिया, गोंदिया जिल्हा महिला अध्यक्ष उषाताई शहारे, देवरी तालुका महिला अध्यक्ष सुभद्राताई अगड़े, तालुका महासचिव बळीराम कोटवार, माजी नगरसेवक ओमप्रकाश रामटेके, देवरी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष कुलदीप गुप्ता, प्रशांत कोटांगले, सर्दुल संगिड़वार, माजी तालुकाध्यक्ष राधेश्याम बगड़िया, माजी उपसरपंच परमजीत सिंग भाटिया, मनोहर उदापुरे, मोहन डोंगरे, अविनाश टेंभरे, छगनलाल मुंगनकर, गणेश भेलावे, भीमराव वालदे, सुरेंद्र बंसोड, कमलेश पालीवाल, सावंतबापू राऊत,केशोरी चे सरपंच भारती सलामे, गडेगावचे सरपंच कविताताई वालदे, किरणताई राऊत, उर्मिला डोये, एँड. श्रावण ऊके, दिलीप श्रीवास्तव सर,देवरी, तालुका काँग्रेस किसान आघाडीचे तालुका अध्यक्ष जीवन सलामे यांच्या सह देवरी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व आघाडी प्रमुख व कार्यकर्ते यांचा सहभाग होता.


या आन्दोलनानंतर संध्याकाळी देवरीचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपति यांच्या नावे एक निवेदन सादर करुण सर्व कायद्यांच्या विरोधात निषेध नोंदविण्यात आले.

Share