शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व ८ वी चे आवेदनपत्र online भरणेकरिता ३० मार्च पर्यंत मुदतवाढ

गोंदिया: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक २५ एप्रिल, २०२१ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे.

सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ०९ मार्च ते २१ मार्च, २०२१ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनदनपत्र भरणेकरीता दि. ३० मार्च, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्याद्वारे परिपत्रक जाहीर करून करण्यात आले आहे.

सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. ३० मार्च २०२१ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त यांनी केले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share