पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्य सल्लागार पी.के.सिन्हा यांनी दिला राजीनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पी.के. सिन्हा यांनी आज राजीनामा दिला आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. सिन्हा यांना सप्टेंबर २०१९ मध्ये पंतप्रधानांच्या मुख्य सल्लागारपदी नियुक्त करण्यात आले होते.
भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९७७ च्या तुकडीचे ते अधिकारी होते. त्यांनी या अगोदर पंतप्रधान कार्यालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी म्हणूनही काम केलेलं ऐआहे. याशिवाय ते ऊर्जा मंत्रालयात सचिवपदी देखील कार्यरत होते. तसेच, त्यांना चार वर्ष मंत्रीमंडळ सचिव म्हणूनही काम केलंलं आहे.