पोलीस स्मृती दिनानिमित्त पोलिस मुख्यालयात कार्यक्रम

गोंदिया,२१

पोलीस स्मृतीदिन-2020 कार्यक्रमा निमित्त कर्तव्यार्थ असताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व जवान या हुतात्म्यांना दिनांक 21 ऑक्टोबर 2020 रोजी कवायत मैदान, पोलीस मुख्यालय गोंदिया (कारंजा) येथे शोक सलामी देवून श्रध्दांजली अर्पण करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गोंदिया मा. श्री. दीपक कुमार मीना व पोलीस अधिक्षक गोंदिया मा. श्री विश्व पानसरे यांनी पोलीस हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गोंदिया मा. श्री. दीपक कुमार मीना यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त संबोधीत करुन शहीद पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रति भावपुर्ण श्रध्दांजली आहेत, ज्यांनी वेळोवेळी कर्तव्य पथावर अग्रेसर असताना लोकतंत्र रक्षणार्थ आपल्या जीवाची पर्वा न करता “आपला आज” देशवासीयांच्या “उद्यासाठी” हसत खेळत स्वत:चे प्राण अर्पण केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणुन 21 ऑक्टोबर हा दरवर्षी भारतभर पोलीस स्मृतीदिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे सांगुन पोलीस स्मृती दिनानिमित्त थोडक्यात संदेश वाचवुन दाखविले. 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस प्रशासनासाठी अत्याधिक महत्वाचा आहे. या वर्षीदेखील संपुर्ण भारतामध्ये आपले कर्तव्य बजावित असताना शहीद झालेल्या एकुण 264 पोलीस अधिकारी व कर्मचा­यांची नावे पोलीस निरीक्षक तथा अति. कार्यभार पोलीस उप-अधीक्षक (मुख्या) श्रीमती वैशाली पाटील व पोलीस निरीक्षक, नक्षल सेल गोंदिया, श्री सुजित चव्हाण यांनी वाचुन दाखविले. सहायक पोलीस निरीक्षक तथा अति. कार्यभार राखीव पोलीस निरीक्षक श्री संदिप चव्हाणयांनी शहीद पोलीस स्मृतीदिन सलामीचे नेतृत्व करुन शोक सलामी दिली व सलामी परेड मधील पोलीस कर्मचारीकडुन प्रत्येकी तीन राऊंड हवेत फायर करण्यात आले. सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गोंदिया मा. श्री. दीपक कुमार मीना, पोलीस अधिक्षक गोंदिया मा. श्री विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया श्री जगदिश पांडे, पोलीस निरीक्षक तथा अति. कार्यभार पोलीस उप-अधीक्षक (मुख्या) श्रीमती वैशाली पाटील तसेच इतर पोलीस अधिकारी/कर्मचारी, मंत्रालयीन स्टाफ व शहीदांचे कुटुंबीय उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन महिला पोलीस शिपाई पुनम मंजुटे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता सहायक पोलीस निरीक्षक श्री संदिप चव्हाण, अरविंद राऊत, पोहवा सेवक राऊत, रोशन उईके, मनापोशि मंगला प्रधान, नापोशि राज वैद्य, मपोशि दर्शना राणे, पोशि वसीम खान तसेच पोलीस मुख्यालय गोंदिया येथील डी.आय. स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले.

Share