देवरी नगरपंचायतच्या प्रभाग क्र १६ मधिल विविध समस्यांचे निवारण करा- इंजी.प्रीति नेताम

प्रहार टाईम्स

मुख्याधिकारी अजय पाटनकर यांना दिले निवेदन

देवरी १०: नगर पंचायत देवरी येथिल प्रभाग क्र १६ येथे सांडपाण्याच्या समस्याचे निवारण करण्या करिता प्रभागवासियांनी इंजी. प्रीती नेताम यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनामध्ये प्रभागातील नाल्या मधील दूषित सांडपाणी तिथेच जमा राहत असल्यामुळे संपूर्ण प्रभागात दुर्गंधी पसरलेली आहे.

दूषित सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्यामुळे डासांच्या संख्येत वाढ झाली असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

प्रभागात पक्के रस्ते नसल्यामुळे नागरिकांना कमालीची कसरत करावी लागते त्यामुळे नागरिकांच्या हिताचे कार्य करण्यात यावे.

प्रभागात नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे परंतु अनियमित पाणी पुरवठा असल्यामुळे लोकांना असह्य त्रास होत असून त्यांचा प्रथम प्राधान्य देऊन समस्यांचा समाधान करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share