मनसे चे १५ वे वर्धापन दिवस फळ वितारणाने संपन्न

प्रतिनिधी / सालेकसा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सालेकसा च्या वतीने 9 मार्च रोजी मनसेचे 15 व्या वर्धापन दिवस साजरे करण्यात आले. त्यानिमित्त ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे उपस्थित रुग्णांना तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना फळ व बिस्कीट वितरण करण्यात आले. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोरोना चे वाढते संक्रमण लक्षात घेता यंदा मनसेचे वर्धापन दिवस निमित्त मोठे कार्यक्रम न घेता छोटेखानी कार्यक्रम घेऊन मनसेचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरे करण्याचे आदेश असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना सालेकसा तालुका च्या वतीने ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे फळ आणि बिस्कीट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. रुग्णालयात उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना कुरूना काळात केलेल्या कार्याबद्दल अभिनंदन व्यक्त करत त्यांचे गौरव करण्यात आले. यानिमित्त मनसेचे तालुका व शहर चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्यात तालुका उपाध्यक्ष दिलीप ढेकवार, अभय कुरंजेकर, ध्रुव कुमार हुकरे, तालुका सचिव अमित अग्रवाल , शहर अध्यक्ष राहुल हटवार, शहर उपाध्यक्ष गोल्डी भाटिया, आमगाव खुर्द विभाग अध्यक्ष राजेश डोये, योगेश कावडे व मयूर पाथोडे, स्वप्नील करवाडे व इतर मनसैनिक उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री रामटेके यांनी सर्व मनसैनिकांची तोंडभरून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें