अपघातग्रस्त रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळवून देण्याकरीता शासनाची “मृत्युजंय दुत” योजना

देवरी येथील आफताब मंगल कार्यालयात “मृत्युजंय दुत” योजनेचा शुभारंभ सोहळा

देवरी, ता. 03: भारतामध्ये दरवर्षी रस्ते अपघात मध्ये दिड लाखाच्या वर लोकांचा मृत्यु होते. या रस्ते अपघाताचे विश्लेषण केल्यावर असे दिसून येते की, अनेकदा रस्त्यावर अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना वेळेवर योग्य उपचार मिळत नाही तर त्यांना योग्यवेळी रुग्णालयात नेले जात नाही तसेच त्या रुग्नांना रुग्णालयात नेत असतांनी व्यवस्थेतीत न उचलल्यामुळे जखमीच्या शरीरास अधिक त्रास होवून यात प्राणहानीचे प्रमाण ही वाढत आहे.

समाजात काही चांगले लोक अपघातग्रस्तांना मदत करतात परंतु पोलीसांचा किंवा न्यायलयाचा ससेमीरा टाळण्यासाठी त्यांना मदत करत नाही, त्याचबरोबर जखमी व्यक्ति हा अनोळखी असल्यास रुग्णालयात उपचार करण्यास वेळ लावतात. या करीता अपघातग्रस्तांना व्यवस्थितरित्या रुग्णालयात नेवुन त्यांना योग्य उपचार त्वरित मिळावा या करिता महाराष्ट्राचे अप्पर पोलिस महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून आणि महामार्ग प्रादेशिक विभाग नागपुरचे पोलिस अधीक्षक श्वेता खेड़कर व पोलिस उपअधीक्षक संजय पांडे आणि पोलिस निरीक्षक वैशाली वैरागड़े यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने “हायवे मृत्युजंय दुत” ही योजना राज्यात आजपासून सुरु केली आहे. या योजनेचे शुभारंभ आज सोमवार(ता. १ मार्च) रोजी देवरी येथे आफताब मंगल कार्यालयातून होत असल्याने सर्व राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग़ा वरील अपघात ग्रस्त रुग्नांना वेळेवर योग्य उपचार मिळवून देण्याकरिता शासनाला सहकार्य करा असे प्रतिपादन महामार्ग पोलिस केंद्र डोंगरगांव चे सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश डेहनकर यांनी केले.


ते देवरी येथे आफताब मंगल कार्यालयात सोमवार(ता.१ मार्च) रोजी आयोजित शासनाच्या “हायवे मृत्युजंय दुत” योजनेचे शुभारंभ सोहळ्यात उपस्थित वाहन चालक व मालकांना मार्गदर्शन करतांनी बोलत होते.


या सोहळ्याचे उद्घाटन देवरीचे माजी नगर उपाध्यक्ष आफताब शेख यांच्या हस्ते आणि डोंगरगांव चे सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश डेहनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या प्रसंगी देवरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल ठाकरे, नर्स ज्ञानेश्वरी कोरोंडे, पत्रकार नंदुप्रसाद शर्मा, महामार्ग सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास गावंडे, पोलिस हवालदार संजय बादलवार, वासुदेव देशमुख, पोलिस शिपाई मनीष बहेरीया, पुष्पराज खंडाते, पोलिस नायक विजेंद्र बोरकर यांच्या सह देवरी-आमगांव, देवरी-साकोली, व देवरी-चिचगड या मार्गावर चालनारे वाहन चालक आणि मालक बहुसंख्येत उपस्थित होते.


यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास गावंडे यांनी आपल्या प्रास्ताविकात या योजनेबद्दल माहिती देतांनी म्हटले की, सर्व मार्गावरिल मॉल, पेट्रोलपंप, ढाबा व हॉटेल मध्ये काम करणारे कमर्चारी तसेच मार्गावरिल परिसरातील गावातील चार ते पाच लोकांचा एक ग्रुप तैयार करुण त्यांना “मृत्युजंय देवदूत” असे नावे द्यावे. यांना जखमी व्यक्तिन्नां कसे हाताळावे या बद्दल प्रक्षिक्षण देने. १०८ या किंवा इतर रुग्णालयातील एम्बुलेंस ची माहिती या ग्रुप ला देने गरजेचे आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने जाहिर केलेले स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची माहिती अपघात ग्रस्त व त्यांचे नातेवाईकांसह सर्व संबंधितांना देने गरजेचे आहे. या योजनेत महामार्ग सुरक्षा पथकाकडून ओळखपत्र देवुन चांगले काम केल्यास यांना प्रशस्तिपत्र सुद्धा देण्यात येणार आहे. आणि चांगले काम करणाऱ्या देवदुताचा नाव रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने घोषित केलेले GOOD SAMARITAN AWARD साठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती दिली.


या सोहळ्याचे संचालन, प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास गावंडे यांनी मानले.

Share