उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच वनवा कसा लागतोय? देवरी तालुक्यातील बहुतांश जंगलात वनवा

प्रहार टाईम्स| भुपेन्द्र मस्के


देवरी ०३ – तालुका जंगलबहुल असुन वनाने व्यापला आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या वनराईत वणवा लागतोच कसा काय असा प्रश्न पर्यावरण प्रेमी विचारू लागले आहे. उन्हाळ्याच्या सुरवातीलाच तालुक्यात वणवे लागण्याच्या घटना वारंवार होत आहेत. याला जबाबदार कोण असा प्रश्न कायमच पर्यावरण प्रेमींना पडला आहे.

मोठमोठी जंगले असणाऱ्या घनदाट जंगलात दुर्मिळ औषधी वनस्पती, पशुपक्षी या वणव्यात जळून खाक होत आहे. याचे भानही या समाजकंटकांना राहिले नाही.सायंकाळी किंवा रात्री असे वणवे लागल्याच्या कित्येक घटना तालुका वासीय उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. वनविभागाच्या कर्मचारी देखील रानावनात भटकून पहारा देत आहे. तरीही वणवा लागण्याच्या घटना थांबता थांबत नाही. यावरून हा वनवा लावतोय कोण? यांची तपासणी वनविभागाने करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी करू लागले आहेत.

Share