महिला न्यायाधीशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि पुरुष वकील चक्क तुरूँगात
वकिलाची जेलमध्ये रवानगी
प्रहार टाईम्स
प्राप्त माहितीनूसार मध्य प्रदेशातील एका वकिलाला महिला न्यायाधीशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं चांगलंच महागात पडलं आहे. वकिलाची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. जामीन मिळावा यासाठी वकिलाने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. वकिलाने ईमेलच्या माध्यमातून न्यायाधीशांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यासाठी त्याने त्यांच्याच फेसबुक अकाऊंटवरुन फोटो डाऊनलोड केला होता. न्यायाधीशांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
९ फेब्रुवारीला रतलाम पोलिसांनी वकील विजयसिंग यादव यांना न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) मिथाली पाठक यांना २९ जानेवारीला ईमेल आणि वाढदिवसाचं कार्ड पाठवलं. विजयसिंग यांनी मिथाली पाठक यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन फोटो डाऊनलोड करत तो वाढदिवसाच्या कार्डसोबत जोडल्याचा आरोप आहे.
तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, विजयसिंग यादव यांनी कोणतीही परवानगी न घेता न्यायाधीशांचा फोटो वापरला आणि त्यांच्या अधिकृत खात्यावर मेल पाठवला. विजयसिंग यादव फेसबुकवर न्यायाधीशांच्या मित्रांच्या यादीत नसल्याने अनधिकृतपणे फोटोचा वापर केल्याने त्यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गतही कारवाईची शक्यता आहे.