रक्तदान अमरत्वाचे माध्यम – जितेंद्र बल्हारे

आमदार सहसराम कोरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान संपन्न

४५ रक्तदात्याने केले रक्तदान

प्रहार टाईम्स / सालेकसा

आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री सहसराम कोरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सालेकसा तालुक्यातील ग्राम निंबा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवा काँग्रेस सालेकसा तालुक्याचे महासचिव जितेंद्र बल्हारे, जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव ओमप्रकाश लिल्हारे यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात एकूण ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्री फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

रक्तदानाच्या माध्यमाने आपले रक्त दुसऱ्यांच्या शरीरात जाते व त्या मार्गाने आपले अंश दुसऱ्यांच्या शरीरात चिरंतर जीवित असते. आपल्या नंतरही आपण दुसऱ्यांच्या शरीरात जिवंत राहून अमरत्व प्राप्त होते. अशी भावना जितेंद्र बल्हारे यांनी व्यक्त केल्या.

यासाठी केटीएस गोंदिया येथील रक्त संकलन चमूला आमंत्रित करण्यात आले आहे. डॉ. संजय चौहान, सतीश पाटील, अनिल गोंडाने, श्रुष्टी मुरकुटे, राजू रहांगडाले, सुनील गोंडाने, पल्लवी रामटेके, मनोज तिवारी इत्यादी मंडळी बाई गंगाबाई रक्तपेढी च्या माध्यमातून उपस्थित होते.

पिपरिया क्षेत्रात रक्ताची नेहमी आवश्यकता असते व त्यासाठी वेळेवर रक्त उपलब्ध नसल्याने खाजगी रक्तपेढीतुन रक्त विकत घ्यावे लागते त्यामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्रासाला सामोरे जावे लागते. त्यावर उपाय म्हणून शासकीय रक्तपेढीत रक्त उपलब्ध करून दिल्याने क्षेत्रातील जनतेस मोफत मध्ये रक्त पुरवठा करता येईल असे जितेंद्र बल्हारे यानी म्हणत जनतेला रक्तदान करण्यास आवाहन केले होते.

यावेळी जितेंद्र बल्हारे, ओमप्रकाश लिल्हारे, काँग्रेस तालुका अध्यक्ष वासुदेव चुटे, मधुकर हरिनखेडे, देवराज मरसकोल्हे, चिंतेश्वर पारधी, खुशाल उपराडे, संदीप बिसेन, रवी कटरे, प्रवीण साखरे, विनय ढेकवार, महेंद्र गौतम, नितेश कटरे तसेच युवक मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Share