साकोली चिचगड ते बुढी बंजारी बस सुरु करा


प्रतिनिधी


चिचगड २: साकोली ते चिचगड दरम्यान धावणारी बूढी बंजारी बस ही सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.


लॉकडाऊन सुरू होण्याच्या पूर्वी साकोली ते बुड्डी बंजारी बस सतत सुरू होती लाकडाऊन सुरू झाल्यानंतर ती बस बंद करण्यात आली होती तरी पण आता नागरिकांनी पुन्हा ती बस सुरू करण्याची मागणी केली आहे ही बस चिचगडला साडे चार वाजे दरम्यान पोहोचत होती त्त्या बस मुळे शाळा कॉलेज सुटल्यावर त्याच बस णे मुलं आपल्या गावी परत जात होती आणि ती बस चिचगडला हाल्टींग असायची आणि सकाळी पुन्हा ती बस कडीकसा इस्तारी, मीसपीरी , महाका आणि बुडी बंजारी बस जात होती .

त्या बसने शाळेत येणाऱ्या मुली आणि मुले तसेच परिसरातील नागरिक यांनासुद्धा जाण्याकरिता सुलभ होत होते आणि आता ती बस बंद झाल्यामुळे शाळेच्या मुला मुलिंना देवरी आणि परिसरात येण्या जाण्याकरिता तसेच चिचगड देवरी साकोली येण्या जाण्याकरिता लोकांना गैरसोय होत आहे त्यामुळे पुन्हा ही बूढी बंजारी बस सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी आणी शाळा-कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींनी ही मागणी केली.

संबंधित अधिकाऱ्यांना व जन प्रतिनिधींना व विशेष करून गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी पण यामध्ये लक्ष देऊन ही जनतेची मागणी पूर्ण करावी अशी जनतेनी मागणी केली आहे

Print Friendly, PDF & Email
Share