लस घेताना मास्क न घातल्यामुळे मोदींवर नेटकरी संतापलेफोटोसाठी काय पण का? असा सवाल

मोदींनी सकाळी सात वाजता घेतली लस, त्यानंतर लस घेतानाचा फोटोही केला पोस्ट

देशामध्ये आजपासून करोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी सात वाजताच दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये लसीची पहिला डोस घेतला. मोदींनी लस घेतानाचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये मोदींसोबत दोन नर्सही दिसत आहेत. लस घेताना मोदी हसत असल्याचे या फोटोत दिसत आहे. मात्र लस घेताना मोदींच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. मोदींनी पोस्ट केलेल्या फोटोखाली त्यांनी मास्क न घातल्याबद्दल अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. काहींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लस घेताना मास्क घातलेला हे दाखवणारा फोटोही पोस्ट केलाय.
मोदींनी ट्विटरला फोटो ट्विट करत ही माहिती दिली आहे. “एम्स रुग्णालयात करोनाचा पहिला डोस घेतला. करोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केलं ते कौतुकास्पद आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, “जे जे लोकं लसीकरणासाठी पात्र आहेत त्यांनी लस घ्यावी असं मी आवाहन करतो. आपण मिळून भारताला करोनामुक्त करुयात” असंही मोदी या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share