ब्लॉसम स्कुलमध्ये जागतिक मराठी दिन उत्साहात साजरा

देवरी 27: तालुक्यातील ब्लॉसम पब्लिक स्कुल मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि जागतिक मराठी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे प्राचार्य डॉ. सुजित टेटे, स्वप्निल पंचभाई , सरिता थोटे, वैशाली मोहूरले, नामदेव अंबादे मराठी विभाग शिक्षक उपस्थित होते.

“ओळखलेत का सर मला पावसात आला कुणी
कपडे होते कर्मटलेले केसांवर्ती पाणी” या कुसुमाग्रज यांच्या कवितेतून शिक्षक आणि विद्यार्थी प्रेम मराठी शिक्षक स्वप्नील पंचभाई यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात जन्मल्याचे अभिमान बाळगा आणि मराठी ला अभिजात दर्जा देण्यासाठी पुढे येऊन मराठीचा जास्तीत जास्त वापर करा असे मत प्राचार्य डॉ सुजित टेटे यांनी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपले मराठी प्रेम कविता, भाषण आणि गीतांच्या माध्यमातून व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन सिद्धी थोटे व गुंजन भांडारकर यांनी केले असून आभार प्रदर्शन प्रणय मोहबे यांनी मानले. शाळेतील राहुल मोहूरले , नितेश लाडे, कोमल चांदेवार व सर्व शिक्षकांनी कार्यक्रमास योगदान केले.

Print Friendly, PDF & Email
Share