सुरतोली विद्यालयाच्या देवांशु परतेकीला UPS 2026 मध्ये यश 

देवरी/लोहारा:  सुरतोली माध्यमिक विद्यालय, लोहारा येथील विद्यार्थ्याने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. Upper Primary Scholarship Examination UPS 2026 मध्ये शाळेतील इयत्ता 7 वीच्या विद्यार्थ्याने पात्रता मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.

UPS परीक्षेसाठी सुरतोली माध्यमिक विद्यालय, लोहार येथून इयत्ता 7 वीचे एकूण 4 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या परीक्षेत देवांशु छगन परतेकी या विद्यार्थ्याने उत्तुंग यश मिळवत पात्रता प्राप्त केली. त्याच्या या यशामुळे संपूर्ण शाळेत आनंदांचे वातावरण आहे. देवांशुच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. शाळेच्या मुख्याध्यापक प्रकाश परिहार व सर्व शिक्षकांच्या मेहनती मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाले. तसेच पालकांच्या पाठिंब्यामुळे देवांशुला ही उंची गाठता आली. शाळेच्या वतीने देवांशुचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. त्याचबरोबर त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें