देवरी: नेशनल एजुकेशन सोसाइटी फॉर ट्राइबल स्टूडेंट्स, MoTA, नई दिल्ली अंतर्गत येणा-या देवरी तालुक्यातील एकलव्य
मॉडेल निवासी शाळा, बोरगाव/बाजार येथे आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ११ वी मध्ये विज्ञान, वाणिज्य व कला शाखेसाठी प्रवेश घेणा-या इच्छूकांनी येत्या शनीवारी ११ एप्रील २०२६ पर्यंत प्रवेश नोंदणी करूण घ्यावे.नंतर रविवार १२ एप्रील २०२६ रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येईल. तरी इच्छूक आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी त्वरीत प्रवेश घ्यावे असे आव्हान शाळेचे प्राचार्य गणेश तोडकर यांनी केले आहे.
या शाळेत प्रवेश घेणा-या अनुसूचीत जमाती(S.T.)च्या विद्यार्थ्यांनी या वर्षीचे १० वी परिक्षा दिले आहे.किंवा १० वी परिक्षा उत्तीर्ण केली आहे. अशा विद्यार्थ्यांनी आपले जातीचे प्रमाणपत्र,बोनाफाईड व फोटो अशा आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज शनीवार (ता.११ एप्रील२०२६) रोजी पर्यंत एकलव्य मॉडेल निवासी शाळा, बोरगाव बाजार येथे सादर करावेत. नंतर प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची प्रवेश परिक्षा येत्या रविवार १२ एप्रील २०२६ रोजी घेण्यात येईल. तरी इच्छूक आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येत त्वरीत प्रवेश घ्यावे असे आव्हान शाळेचे प्राचार्य गणेश तोडकर यांनी केले आहे.








