‘त्या’ पेट्रोल पंप चालकाला ‘कारणे दाखवा’

जिल्हा पुरवठा विभागाची कारवाई : पेट्रोल पंप बंद ठेवल्याबाबत मागितला खुलासा

गोंदिया: अखाती देशात सुरू असलेलया युद्धामुळे इंधन तुटवड्याचे संकट निर्माण झाले असून बुधवारी २५ मार्च रोजी सोशल मिडीयावरील अफवेमुळे जिल्ह्यात काही काळ आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. असे असताना तिरोडा येथील एका पेट्रोल पंप संचालकाने त्याचे पेट्रोल पंप बंद ठेवल्याने जिल्हा पुरवठा विभागाकडून सदर पेट्रोल पंप संचालकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे. तर त्या बाबतचा खुलासा सादर करण्याचे निर्देशही दिले आहे. सद्याची युद्धजन्य परिस्थिती पाहता इंधन तुटवडा होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वच पेट्रोल पंप धारकांना पेट्रोल, डिझेलचा पुरेशा साठा उपलब्ध ठेवण्यातबाबतचे निर्देश देण्यात आले आहे. तर विक्री अधिकारी यांच्याकडून तशा सुचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहे. त्यात बुधवारी सोशल मिडीयावरील काही अफवांमुळे जिल्ह्यात काही काळ आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, तिरोडा येथील पेट्रोलपंप संचालक विशाल शेंडे यांनी त्यांचे मे. कृष्णकुमार एन्ड (एचपीसीएल) हे पेट्रोल पंप दिर्घ कालावधीपासून बंद अवस्थेत ठेवल्याचे निदर्शनास आले. यावर सद्याची युद्धजन्य व आणिबाणीची परिस्थिती लक्षात घेता शेंडे यांनी ग्राहक व प्रशासनाची दिशाभूल केली असल्याचा ठपका ठेवत त्यांना जिल्हा पुरवठा विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यात शेंडे यांना ३० मार्च रोजी समक्ष हजर राहून खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. खुलासा सादर न केल्यास त्यांच्यावर द्रवीकृत पेट्रोलियम गॅस (पुरवठा आणि वितरण नियमन) आदेश २००० तसे जिवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही सदर नोटीस मध्ये देण्यात आला आहे. 

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें