युवा कवी उमेंद्र बिसेन यांना ‘काव्य प्रतिभा सन्मान पुरस्कार’

पिंपरी (प्रतिनिधी): काव्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा कवी उमेंद्र बिसेन यांना “काव्यात्मा साहित्य परिषद” आयोजित राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात ‘काव्य प्रतिभा सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

पिंपळे गुरव येथे आयोजित या सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत गझलकार म.भा. चव्हाण यांच्या हस्ते उमेंद्र बिसेन यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या प्रभावी लेखनशैलीमुळे आणि समाजाभिमुख कवितांमुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

युवा वयातच काव्यलेखनाच्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवर भाष्य करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कवितांमध्ये सामाजिक जाणीव, भावनांची खोली आणि वास्तवाचे चित्रण दिसून येते.

या सन्मानामुळे त्यांच्या साहित्यिक वाटचालीला नवी ऊर्जा मिळणार असून, भविष्यातही ते अधिक प्रभावी साहित्यनिर्मिती करतील, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें