देवरी येथील महामार्गावर वाहतूक सुरक्षा रामभरोसे? पहिली पसंती शिरपूर चेक पोस्टला !

◾️डिसेंबर महिन्यात देवरीसह महामार्गावर अपघातांचे तांडव

◾️शालेय विद्यार्थी, महिला आणि वृद्ध नागरिकांची वाढली चिंता, सबंधित प्रशासन उदासीन

देवरी 23: राज्यात गेल्या सहा महिन्यांत गेल्यावर्षीच्या तुलनेत अपघात संख्या सुमारे 25 टक्क्यांनी वाढल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अपघातांसह त्यात मृत्यूपावणार्‍या प्रवाशांचा आकडा तब्बल 28 टक्क्यांनी वाढला आहे.

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या देवरी शहरातून महामार्ग 53 (मुंबई ते कोलकाता) गेलेला असून RTO चेक पोस्ट असल्याने मोठ्या प्रमाणात जळवाहनांची वरदळ असते. राष्ट्रिय महामार्गावर देवरी शहर वसलेले असून मुख्य बाजारपेठ , शाळा , महाविद्यालये आणि शिक्षणासाठी ग्रामीण भागातून मोठ्याप्रमाणात विद्यार्थी , मजूर , कामगार आणि सर्वसामान्य नागरिक शहरात हजेरी लावत आहेत. शहराच्या मधोमध गेलेल्या महामार्गवर उभे असलेल्या अनाधिकृत पार्क केलेल्या ट्रक व जळवाहनांमुळे महामार्गावरून येणारे जाणारे वाहन दिसत नसल्यामुळे अनेक अपघात झाले असून जीव गमावल्याचे घटना ताज्या आहेत. महामार्ग ओलांडतांना जिव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. या कडे महामार्ग पोलीस आणि वाहतूक पोलीस विभागाचा सर्रास दुर्लक्ष असून देवरी येथील जनसामान्याची सुरक्षा राम भरोसे असल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे सबंधित विभागाची पहिली पसंती शिरपूर/देवरी चेक पोस्ट ठरत असून वाहतूक विभागाची जबाबदारी नसलेले वाहन चालक देखील चालान मशीन घेऊन कसून कर्तव्य बजावत असल्याचे चित्र आहे.

प्रामुख्याने देवरीचे मुख्य चौक असलेले अग्रसेन चौक, बस स्टाप, चिचगड चौक, पोस्टऑफ़िस, बैंक ओफ बदोडा, स्टेटबैंक, बैंक ओफ इंडिया , कनेरा बैंक, पंचायतसमिती, तहसीलकार्यालय, शाळा महाविद्यालये , नगरपंचायत परिसरात सर्वात जास्त अनियंत्रित वाहतूक आणि अनधिकृतपणे उभे असले ट्रक व जडवाहनामुळे अपघाताचे चित्र बघावयास मिळते. विशेष म्हणजे हेसर्व सर्रास घडत असून सुद्धा सबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, महिला, मजूर आणि सर्व सामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

ग्रामीण भागातील लोक तालुक्याच्या ठिकाणी कृषीविषयक साहित्य आणि जीवनोपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी देवरी येथील बाजारपेठेत हजेरी लावतात. बेजबाबदारपणे भर रस्त्यावर ट्रक व जडवाहने उभी केली जात असून त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो.

बँक, पोस्ट ऑफिस , तहसील कार्यालये महामार्गावर असल्यामुळे याठिकाणी नेहमीच मोठीगर्दी असते. त्यामुळे भविष्यात घडणाऱ्या अपघातापासून जिव वाचविण्यासाठी स्वतःची काळजी स्वतः घेणे हाच एकमेव उपाय शिल्लक आहे. प्रशासन कुठलीही जबाबदारी स्वीकारत नसल्याचे चित्र दिसून येते.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें