देवरी : दीनबंधू ग्रामीण विकास संस्था, देवरी यांच्या वतीने ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या “दीनबंधू अभ्यासिका” या सुसज्ज अभ्यासिकेच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. २८ डिसेंबर २०२५, रविवार रोजी सकाळी ११.३० वाजता दीनबंधू अभ्यासिका, प्रभाग क्र. ४, गोपाल चौक, देवरी, जि. गोंदिया येथे संपन्न होणार आहे.
या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वातानुकूलित व्यवस्था, शांत अभ्यासाचे वातावरण, अद्ययावत ग्रंथालय, मोफत Wi-Fi (E-Library), सीसीटीव्ही सुरक्षा, स्वच्छ पिण्याचे पाणी तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व Guest Lecture अशा आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
लोकार्पण सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, पालक व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी योग्य दिशा व संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सदर कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दीनबंधू ग्रामीण विकास संस्था, देवरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.









