दिनबंधू ग्रामीण विकास संस्थेतर्फे ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन
देवरी : धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर दिनबंधू ग्रामीण विकास संस्था, देवरी यांच्या वतीने “दिवाळी पहाट” हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दीपोत्सवाच्या मंगल प्रभातीत स्नेह, मैत्री आणि संस्कृतीचा संगम साधण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रम शनिवार, दि. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ५ वाजता तालुका क्रीडा संकुल मैदान, पोलिस स्टेशनजवळ, चिचगड रोड, देवरी येथे पार पडणार आहे.
या सांस्कृतिक मैफलीत सुप्रसिद्ध गायक विजय वाहोकार, प्रज्योत देशमुख तसेच तनुश्री भालेकर हे आपल्या सुरेल गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहेत. संगीताची साथ मनोज राऊत , आनंद बोराटने , रामजी लाहुडकर, अनिल डोंगरे आणि सागर पारेकर हे देणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे करणार असून दिनबंधू ग्रामीण विकास संस्थेतर्फे ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे स्नेहपूर्ण निमंत्रण आहे.









