देवरी दसरा उत्सवाची जय्यत तयारी 51 फुटाचा रावणाचा पुतळा तयार

◼️सूपर ३० च्या संकल्पनेतून विजयादशमी ची तयारी

देवरी : दसरा उत्सव समितीची जय्यत तयारी सुरु असून 51 फुटाचा आकर्षक रावणाचा पुतळा तयार करण्यात आला आहे. दसरा निमित्ताने आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी देवरावाशीयांना अनुभवायास मिळणार आहे. यावेळी मनोरंजनासाठी असलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असून श्रीरामाच्या झाकीचे प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती दसरा उत्सव समितीच्या सदस्यांनी सांगितले.दशहरा उत्सव समिती, देवरी यांच्या वतीने दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी भव्य दशहरा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला Super 30 यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.

या निमित्ताने शहरात श्रीरामाच्या प्रतिमेसह आकर्षक सजावट व फटाक्याची आतिषबाजी ची मेजवानी आहे. समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी आवाहन केले आहे.शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा धार्मिक व सांस्कृतिक सोहळा यशस्वी करावा, असे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें