
गोंदिया : राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी इत्यादी कामासाठी तसेच शेतीमाल बाजारात पोहचवण्यासाठी बारमाही शेतरस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीतील कामांसाठी यंत्रसामुग्रीचा वापर वाढत असल्यामुळे शेतापर्यंत पोहचण्यासाठी चांगले रस्ते असणे गरजेचे आहेत. राज्यात मुळ जमाबंदी वेळी तयार करण्यात आलेल्या नकाशामध्ये तसेच एकत्रिकरण योजनेवेळी तयार करण्यात आलेल्या गटांच्या गाव नकाशामध्ये त्यावेळी अस्तित्वात असेलेले ग्राम रस्ते, शिव रस्ते, गाडी मार्ग, पाय मार्ग इत्यादी दर्शविण्यासात आलेले आहेत. मात्र, त्यानंतर वेळोवेळी तयार करण्यात आलेल्या नविन रस्त्यांच्या नोंदी गाव दप्तरी नसल्यामुळे स्थानिक पातळीवर या रस्त्यांच्या वापराबाबत तक्रारी, अतिक्रमण इत्यादी समस्या उद्भवत आहेत. यामुळे आता ग्रामीण भागातील रस्त्यांना क्रमांक देऊन त्यंची रेकॉर्डवर अधिकृत नोंदणी केली जाणर आहे.
प्रत्येक गावतील ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी हे महसूल सेवक व त्या गावचा पोलीस पाटील यांच्या मदतीनपे रस्त्यांची यादी तयार करतील. याकरिता प्रत्येक गावात सज्जामध्ये स्थानिक नागरिकांसह शिवार फेरी आयोजित करण्यात येईल. या यदीमध्ये गाव नकाशावर नोंद असलेले वापरातील तसेच अतिक्रमण झालेले सर्व रस्त्यांची नोंद घेण्यात येईल.
अतिक्रमित रस्त्यांबाबत मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी रस्ता निहाय प्रस्ताव तयार करतील. यामध्ये लगतचे शेतकरी यांचे परिपूर्ण नाव, ७/१२ उतारा, फेरफार नोंदी इत्यादी यांचा तपशिल नमूद करतील. गावनिहाय तयार करण्यात आलेली रस्त्यांची प्राथमिक यादी ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या माहितीसाठी ठेवण्यात येईल. ग्रामसभेच्या मानयतेनंतर अंतिम झालेली यदी ग्रामसभेच्या ठरावासह तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात येईल. ग्रामसभेत मान्यता प्राप्त झाल्यानंतर सदर यादी मधील गाव नकाशात नसलेले व अतिक्रमित रस्त्यांची यादी तहसीलदार यांच्यामार्फत उपअधिक्ष्का, भूमि अभिलेख यांना उपलब्ध करून देण्यता येईल. या यादीतील रस्त्यांचे उपअधिक्षक, भूमिअभिलेख यांच्या कार्यालयांमार्फत सीमांकन करण्यात येईल. सीमांकन करतांना रस्तयांची सध्याची उपलब्धता आणि नकाशावरील त्यांची मूळ जागा विचारात घेतली जाईल. भूमिअभिलेख विभागातर्फे मुळ गाव, नकाशांचे स्कॅनिंग, डिजीटायझेशन व भूसंदर्भिकरण केलेल्या नकाशांचे आधारे जागेवरील रस्त्यांचे सिमा अक्षांश रेखांशासह निश्चीत करावेत व सदर भुसंदर्भिकरण केलेले गाव नकाशांच्या उपयोग करून शेतरस्त्यांचे हद्दीवर सिमा चिन्हे स्थापित करण्यात यावेत असे शासनाच्या आदेशात नमूद केले.








