16 सप्टेंबर पासून गोंदिया- इंदोर एअर स्टारची सेवा, वेळापत्रक जाहीर

गोंदिया: तालुक्यातील बिरसी विमानतळामध्ये एअर स्टारने सेवा सुरू करण्याचे वेळापत्रकार जाहीर केले आहे. एअर स्टारची इंदूर-गोंदिया-इंदूर विमानसेवा १६ सप्टेंबरपासून सुरू होणार असून आठवड्यातून तीन दिवस उड्डाण भरणार आहे. तालुक्यातील बिरसी विमान तळावरून इंडिगोची गोंदिया-हैदराबाद विमान सेवा सुरू आहे. शेकडो नागरिक हैदराबादमार्गे मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये प्रवास करत आहेत. त्यातच इंदूरच्या देवी अहिल्याबाई होळकर विमानतळाने रविवारपासून पुढील सहा महिन्यांसाठी वेळापत्रक लागू केले आहे. या काळात विमानतळावरून १०० उड्डाणे चालविली जातील.

या अंतर्गत फ्लाय बिग एअरलाइन्सने बंद केलेली इंदूर-गोंदिया विमान सेवा स्टार एअर एअरक्राफ्ट कंपनी पुन्हा सुरू करत आहे. स्टार एअर यामध्ये पुनरागमन करत आहे आणि गोंदियासाठी २९ ऑगस्टपासून सेवा सुरू करण्यासाठी वेळापत्रक जारी केले आहे, या वेळापत्रकानुसार १६ सप्टेंबर ही उड्डाणाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. प्रवासासाठी बुकिंग प्रक्रिया सुरू झाली आहे. गोंदिया-इंदूर भाडे १४९९ रुपयांपासून सुरू होते. Gondia Airport ही उड्डाणे आठवड्यातून तीन दिवस मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवससी राहील. या संदर्भात, गोंदियाच्या बिरसी विमानतळाचे विमानतळ अधिकारी वर्मा यांनी पुढील काही दिवसांत उड्डाण सुरू होण्याची पुष्टी केली आहे.

स्टार एअरच्या वतीने सुरू करण्यात येणारी विमानसेवा आठवड्यातील_ मंगळवार, बुधवार व शुक्रवारला उपलब्ध राहणार आहे. इंदूर येथून सायंकाळी ५ वाजता विमान उड्डाण भरेल व सायंकाळी ५.५५ वाजता गोंदिया विमानतळावर उतरेल. तसेच गोंदिया येथून सायंकाळी ६.२५ वाजता उड्डाण भरेल व संध्याकाळी ७.३० वाजता पोहचेल. हा प्रवास ५५ मिनिटाचा राहणार आहे

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें