◼️ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे श्रावण ऋतूच्या पार्श्वभूमीवर स्तुत्य उपक्रम
देवरी ◼️तालुक्यातील अग्रगण्य ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे श्रावण महोत्सवाला थाटात साजरा झाला असून शाळेतील केजीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन विषयावर वेशभूषा करुन सर्वांचे मने जिंकली.
विशेष म्हणजे प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या संकल्पनेतून श्रावण महोत्सवाची सुरुवात झाली असून चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवा श्रावण ऋतूची माहिती असावी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने सदर उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विविध नैसर्गिक संदेश देणारे वेशभुषा करून विद्यार्थी सहभागी झाले होते.
यामध्ये विद्यार्थ्यांनी येरे येरे पावसा… सरी वर सरी… आदि कविता गायन करीन आनंदोत्सव साजरा केला. सदर कार्यक्रमाच्या यशासाठी पूर्वप्राथमिक चे शिक्षिका मनीषा काशीवार, प्रियांका सलामे , प्रियांका आंबिलकर, अचल भगत, आरती चौधरी यांनी सहकार्य केला.








