देवरी : तिज उत्सव समिती देवरी तर्फे मागील 9दिवसापासुन तिज उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आले. त्यात महिला भगिनी रोज मऊदार माती मद्ये एक टोपली घेऊन गहू ची पेरणी करतात. आणि नंतर 9दिवस त्याची पूजा करतात व नृत्य सादरीकरण करतात आणि रोज त्या टोपलीत पाणी घालतात नंतर त्या टोपलीतील गहू ची छान अशी वाढ़ होते ही परंपरा बंजारा समाज प्राचीन काळापासुन आपली संस्कृती लोप पाहू नये म्हणून महाराष्ट्र भर तिज उत्सव साजरा करतात तशातच देवरी येथे सर्व विभाग चे कर्मचारी यांनी एकत्र येऊन सलग चार वर्ष पासून हा कार्यक्रम आयोजित करतात. आपली येणारी पिढी यांना या संस्कृती चा विसर होऊ नये म्हणून आपल्या गावापासुन तांड्या पासून दूर राहताना या पिढीने ही संस्कृती विसरू नये हाच महत्वाचा उद्देश तसेच या कार्यक्रमातून एक महत्वाचे म्हणजे गहुची उगवन क्षमता किती दिवसात होऊ शकते असा पण एक वैज्ञानिक दृष्टीकोण या समाजाने पूर्वी पासूनच जपला आहे हे दिसून येते.
गोकुळाष्टमीचा दिवस येतो तीजेच्या टोपल्या घेऊन नायकाच्या घरासमोर सगळे भगिनी एकत्र जमतात. आणि तांड्यात जणू सणाच्या रंगाची उधळणच होते गावातील महिला भगिनी आणि कुमारीका आपल्या पारंपारिक बंजारा वेशभूषेत असतात रंगीबिरंगी घागरे त्यांच्या हालचालींमध्ये झुलतात परंपरेचे दागिने उन्हात चमकतात. ढोल ताशाच्या गजरात. ” मन लोवडी दरा रे वीर आजम चाली रे “”या बंजारा गाण्याच्या सुरात आणि पावलाच्या ठेक्यात संपूर्ण तांडा नदीकडे येतो नदीकाठी पोहोचल्यावर गहू पेरलेल्या टोपल्या श्रधेने पाण्यात सोडल्या जातात. हा केवळ विधीच नसतो तो एकतेचाआणि श्रद्धेचा आणि परंपरेच्या अभिमानाचा सोहळा असतो. तसेच या देवरी तांड्यामध्ये आदरणीय आमदार महोदय माननीय संजय भाऊ पुराम यांच्या पत्नी आदरणीय सविताताई पुराम जि प सदस्य तथा माझी महिला बालकल्याण सभापती यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून प्रत्यक्ष रॅलीमध्ये सहभाग घेऊन देवरी तांड्यातील भगिनी सोबत नृत्य सादरीकरण केलं आणि सर्व बंजारा बांधव यांना तिज उत्सवाच्या शुभेच्छा देत आपण बाहेरगावी असून सुद्धा आपली परंपरा कायम चिरकाल टिकून राहावे व येणाऱ्या पिढीने ही परंपरा विसरू नये आपल्या समाजाची ही परंपरा लोप पाहू नये म्हणून हा उत्सव आपण साजरा करता हे अभिमानास्पद बाब आहे. असे मत ताईंनी व्यक्त केले. तसेच देवरीतले सर्व विभागाचे सर्व कर्मचारी यांच्या सहकार्याने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. यामध्ये सर्वांचेही महत्त्वाची भूमिका असते जरी हे कर्मचारी आपल्या जन्मभूमीच्या गावापासून दूर असले तरी आपल्या कर्मभूमी मध्ये आपल्या मुलांवर हे संस्कार कायम रुजले जावे.म्हणून हा उत्सव मोठा जल्लोषाने देवरी मध्ये दरवर्षी साजरा करण्यात येतो या कार्यक्रमा चे मुख्य नायक गोकुळ राठोड प्रकाश चव्हाण कारभारी शिवम राठोड मिथुन चव्हाण रवी जाधव पंकज राठोड हरिदास राठोड निलेश जाधव कमलेश चव्हाण सुनील राठोड सचिन राठोड उत्तम नोळे किशोर ब्राह्मण उमेश चव्हाण शरद पवार सिद्धेश्वर राठोड अंकुश पवार शक्ती चव्हाण मुकेश राठोड निलेश राठोड दारासिंग राठोड योगेश राठोड उमेश आडे या सर्व गोर बंजारा बांधव यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला.








