हर घर तिरंगा ,हर घर स्वच्छता , तंबाखू ,गुटखामुक्त अभियान संपन्न

Deori: मनोहरभाई पटेल हायस्कूल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत हर घर तिरंगा दिनांक १३/०८/२०२५ रोजी पिंकी कटकवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचे महत्व सांगितले.
भारत सरकारच्या या उपक्रमांतर्गत दिनांक १४/०८/२०२५ रोजी नुतन सयाम नगरसेविका न.पं.देवरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, आपल्या स्वप्नातील भारत कसा असावा,स्वच्छ सुंदर भारत तरुणांनी तयार करायचा आहे.असा संदेश दिला.
हर घर तिरंगा या उपक्रमाचा तिसरा दिवस दिनांक १५/०८/२०२५ रोजी माजी प्राचार्य के.सी.शहारे यांच्या अध्यक्षतेखाली देवरी शहराचे प्रथम नागरिक संजूभाऊ उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी संजूभाऊ उईके यांनी देश रक्षणासाठी तरूणांनी जबाबदारी स्वीकारावी असे मार्गदर्शन केले. के. सी.शहारे सरांनी आजचा तरुण उद्याचा राष्ट्रनिर्माता आहे.असे मत व्यक्त केले. यावेळी माननीय प्राचार्य जी.एम.मेश्राम, मुख्याध्यापक व्ही.एस.गेडाम,उपमुख्याध्यापक एस.पी.देशमुख, पर्यवेक्षक डी.एच.ढवळे,शाळा उपप्रमुख राजू कारेमोरे तसेच शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष आर.डी.जगने, सहसचिव सोनू निखाडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें