दहीहंडी उत्सवातून संस्कृतीसह तरुणाईच्या जल्लोषाचे दर्शन – आमदार संजय पुराम

देवरी – दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा भारतीय जनता पक्ष तथा युवा मोर्चाच्या वतीने आणि आमदार संजय पुराम यांच्या विशेष सहकार्याने १७ ऑगस्ट रविवारला भव्य दहीहंडी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संजय पुराम, सभापती अनिल बिसेन , नगराध्यक्ष संजू उईके , यादोराव पंचमवार, संजय दरवडे आदी मंचावर उपस्थित होते.
२०१४ ला आमदार झाल्यापासून देवरीच्या विकासासाठी कटिबद्ध असून पुन्हा मला आमदार करून विधानसभेत पाठविलेल्या देवरीकरांना देवरीच्या विकासासाठी झटणार असल्याचे आमदार संजय पुराम यांनी दहीहंडी उत्सवात भावना व्यक्त केल्या. यावेळी देवरी परिसरातील युवा तरुणासोबत संजय पुराम यांनी गोविंदा आला रे गाण्यावर ठेका धरीत सर्वांचे मने जिंकली. 

सदरकार्यक्रमात देवरीच्या ब्लॉसम पब्लिक स्कूलच्या बाल श्रीकृष्णाने संपूर्ण जनतेला आकर्षित करीत सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी सर्व उपस्थित बाल राधा कृष्णाचे भेटवस्तू देवून कौतुक करण्यात आले. दुपारी २ वाजता पासून विविध ठिकाणी चौकातून दहीहंडी स्पर्धेला सुरुवात झाली दुर्गा चौक, कारगील चौक आणि शेवट जिल्हा परिषदेच्या पटांगणावर दहीहंडी कार्यक्रम संपन्न झाले असून स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. सदर स्पर्धेत प्रमोद संगीडवार, संजू उईके , अनिल बिसेन , यांच्या कडून प्रत्येकी एकवीस हजार एक रुपयांचे एकूण ३ बक्षीसदेण्यात आले असून सोबत आकर्षक शिल्ड सुद्धा देण्यात आले .
सदर कार्यक्रमाला मूर्तरूप देण्यासाठी इंदरजीतसिंग भाटीया, राजू शाहू , पारस कटकवार, नितेश वालोदे, दिशांत चन्ने, विलास शिंदे, सुशील जैन, दिनेश भेलावे, सोनू चोपकर, माजीद खान, इमरान खान आणि दिपक शाहू यांच्यासह भाजप युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें