देवरी :डिजिटल युगातील वाढता सायबर धोका लक्षात घेता, ब्लॉसम पब्लिक स्कूल, देवरी येथे दिनांक ३१ जुलै दरम्यान सायबर सिक्योरिटी जनजागृती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सायबर तज्ज्ञ सहाय्यात पोलीस निरीक्षक मिलिंद गेडाम तसेच पोलीस हवालदार इस्कापे, कांदे , निलम गजभिये , पठाण यांच्या सह स्टाफ यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, सोशल मीडियावरील फसवणूक, सुरक्षित पासवर्ड वापर यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत सायबर सुरक्षा विषय समजून घेलते.
कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापक डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा योग्य आणि जबाबदारीने वापर केला पाहिजे. सायबर जागरूकता ही काळाची गरज आहे.”कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरिता थोटे , नितेश लाडे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी वर्गाचा मोलाचा सहभाग लाभला.









