मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न

देवरी : स्थानिक मनोहरभाई पटेल विज्ञान व कला कनिष्ठ महाविद्यालय देवरी येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जी.एम. मेश्राम, मुख्याध्यापक व्ही.एस.गेडाम, पर्यवेक्षक डी.एच.ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सर्व मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तसेच रासेयो स्वयंसेवकांनी आपले विचार व्यक्त केले.
अशा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो प्रमुख -जगदीश खेडकर यांनी केले तर आभार अश्विनी झंजाळ यांनी मानले.व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें