वरुड – शहरातील रुपेश विजय शिवहरे यांनी हरीष शिवहरे यांचे विरुद्ध जिल्हापरिषद बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने हरीष शिवहरे यांनी कार्यालयाची दिशाभूल करुन तांत्रिक पंजीकरण प्राप्त केल्याचे सिध्द झाल्याचा ठपका ठेवत शासन निर्णयान्वये हरिष शिवहरे यांना एक वर्षाकरीता ग्रामविकास विभागातील नाम नोंदणी यादीतून काढून टाकण्यात येत असल्याचे आदेश अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी पारीत केले होते. या आदेशाविरुध्द हरिष शिवहरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अपिलीय अधिकारी यांच्याकडे दाद मागीतली असता अपिलीय अधिकारी यांनी दोन्ही कडील बाजु ऐकुन अखेर हरिष शिवहरे यांना न्याय मिळवुन दिला. या प्रकरणी ॲड. अंकीता जैस्वाल यांनी यशस्वी युक्तीवाद केला.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पारीत केलेल्या आदेशाविरुद्ध हरिष शिवहरे यांनी अपिलीय अधिकारी यांच्याकडे दाद मागितली असता अपिलीय अधिकारी यांनी हरिष शिवहरे यांना तक्रार मांडण्याकरीता १५ मे २०२५ रोजी दस्तऐवजासह उपस्थित राहण्याबाबत सुचित करून सुनावणी घेण्यात आले. सदर सुनावणीमध्ये हरिष शिवहरे यांना तक्रार मांडण्याबाबत सुचित केले, परंतु हरिष शिवहरे यांना त्यांची बाजु मांडणे शक्य नसल्यामुळे ॲड. अंकीता जैस्वाल यांना त्यांच्यातर्फे बाजु मांडण्याकरीता परवानगी देण्यात आली. दरम्यान ॲड.अंकीता जैस्वाल यांनी यशस्वी युक्तीवाद करीत अपीला संदर्भातील मुद्दयांबाबत विचारणा केलेल्या प्रश्ना संदर्भात कुठलेही दस्तऐवज किंवा पुरावा बांधकाम विभाग अधिनस्त पंजीकरण शाखा हरिष शिवहरे विरुध्द सादर करु शकलेले नाही. दरम्यान संचिता महापात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अपीलीय अधिकारी यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकुन आदेश पारीत केला की, हरिष विजय शिवहरे, रा. वरुड यांचे पंजीकरण संदर्भात अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेले १८ सप्टेंबर २०२४ चे शास्ती आदेश रद्द करत असुन या आदेशान्वये हरिष शिवहरे रा, वरुड यांचे नाव ग्राम विकास विभागातील नाम नोंदणी यादीत पुर्ववत समाविष्ट करावे असे नमुद करीत आदेश पारीत केल्याने अखेर हरिष शिवहरे यांना न्याय मिळाला. या प्रकरणात ॲड.अंकीता जैस्वाल यांनी यशस्वी युक्तीवाद करुन हरिष शिवहरे यांना न्याय मिळवुन दिला.








