मोटार सायकल अंदाजे १.००,०००/रु रुपयाचा माल जप्त
देवरी: देवरी पोलिसांनी मोटर सायकल चोरांना बेड्या ठोकल्या असून ३ मोटर सायकल जप्त करण्यात आल्या. २१/०५/२०२५ रोजी पोलीस स्टेशन देवरी येथे मौजा सुरतोली येथुन अज्ञात ईसमाने मोटार सायकल चोरी केल्याने फिर्यादीचे रिपोर्ट वरुन अज्ञात आरोपी विरुध्द कलम ३०३ (२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक गोरख भामरे, विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधीकारी उपविभाग देवरी चे मार्गदर्शनात आरोपी शोध घेवुन आरोपी नामे सौरभ भाष्कर भुते, वय २१ वर्षे रा. मुल्ला, ता. देवरी, जिल्हा गोंदिया यास दिनांक ३०/०६/२०२५ रोजी ताब्यात घेवुन त्यास गुन्हयात अटक करुन त्याचे कडुन पो. स्टे. देवरी येथील गुन्हयात चोरीस गेलेली मोटार सा.क्र. १) हिरो कंपनीची HF – DELUXE मो.क्र.MP-50/MS-6967 तसेच २) होंडा कंपनीची ड्रीम युगा मो. क्र. CG-08/S-1598 काळया रंगाची लाल पटटा असलेली जिचा चेसीस क्र.. BME4JC586HDT0428820 तसेच आणि ०३) हिरो कंपनीची HF DELUXE मो. सा. क्र MH-40/BW-1189 काळया पांढरा पटटा असलेली काळया रंगाची जिचा चेसीस क्र. MBLHAN823K5B86777 ही भंडारा जिल्हा येथुन चोरी केल्याचे सांगितल्याने त्याचे कडुन ०३ मोटार सायकल अंदोज किंमती १,००,०००/रु. मुददेमाल ताब्यात घेण्यात आले.
गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण डांगे देवरी यांचे मार्गदर्शनाखाली पो. हवा हेमंत मस्के/२३२ हे करीत असुन सदर गुन्हयातील आरोपीचा पो. हवा हेमंत मस्के/२३२ व पो.शि. विनोद बिसेन १२०३ यांनी शोध घेवुन आरोपीस ताब्यात घेतला आहे.








