अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 26.29 कोटींची भरपाई

गोंदिया: गतवर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्या शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईचा 26.29 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यावर रक्कम टाकणे सुरू आहे.

सन 2024 च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन धानासह इतर पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानीचे कृषी व महसूल विभागाने पंचनामे करून अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला. जिल्हा प्रशासनाने नुकसान भरपाईसाठी शासनाकडे निधीची मागणी केली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 27 हजार शेतकर्‍यांच्या 10 हजार 674 हेक्टरमधील पिके बाधित झाली. यात 26 कोटी 29 लाख 27 हजार रुपयांचे नुकसान झाले होते.

त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातही परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने 13 हजार शेतकरी बाधित झाले. 8 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे निधीची मागणी केली होती. त्यानंतर शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र अनेक नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी ई-केवायसी केली नसल्याने मदतीची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा झाली नव्हती. ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून शेतकर्‍यांनी त्यांचे बँक खाते तपासून घेऊन रक्कम जमा झाली का? याची पडताळणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें