कचारगडच्या विकासाठी टप्प्याटप्प्याने मिळणार निधी: आदिवासी विकास मंत्री

सालेकसा:  राज्याच्या पुर्व टोकावरील कचारगड आशिया खंडातील आदिवासींचे दैवत  व पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक आहे. मॉ कली कंकाली कोपार लिंगो पेनठाणा बढादेव नावाने या स्थळाची ओळख आहे. मात्र या स्थळाचा पाहिजे तसा आजही विकास झाला नाही. कचारगडचा विकास आराखडा तयार करून त्याला मंजूरी प्रदान करून टप्प्याटप्प्याने निधी देऊ, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली. ते 12 फेब्रुवारी रोजी जनजाती चेतना समिती कार्यालयात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना बोलत होते.कचारगड यात्रेवेळी रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य यावर भर दिला जाईल. राज्यात साडेसहा लाख आदिवासी असून त्यांच्या सर्वांगिण विकासाठी शासन कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले. यावेळी स्थानिक आमदार संजय पुराम, जनजाती चेतना समितीचे अध्यक्ष नाजूक कुंभरे, आदिवासी नेते प्रकाश गेडाम यांच्यासह माध्यम प्रतिनिधी, समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

कचारगड येथे आशियातील मोठी गुहा आहे. येथे आदिवासींचे आराध्य दैवत आहे. दरवर्षी येथे माघ पौर्णिमेला कोया पुनेम उत्सव यात्रा भरते. देशभरातून आदिवासी येथे दर्शनासाठी येतात.  मात्र येथे भक्तनिवास, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, पक्का रस्ता नाही, विद्युत व्यवस्था नाही, जवळच दरेकसा रेल्व स्थानक असून दुपार पाळीत ट्रेन नाही, महिलांसाठी प्रसाधन गृह नाही आदी अनेक सुविधा नसल्याने यात्रेकरुंची कुचंबना होते. दरवर्षी नेते, मंत्री महोदय येतात आणि आश्वासनाचे गाजर देऊन निधून जातात.

मुंबईवरून कचारगडचे अंतर 1100 किमी आहे. हा परिसर जंगलव्याप्त, आदिवासी, नक्षल प्रभावित आहे. कचारगड येथील यात्रेत देशभरातून लाखो आदिवासी दर्शनासाठी येतात.  मात्र येथे अपेक्षित सुविधा नाहीत. ही बाब शासन व प्रशासनालाही माहित आहे. 2018 मध्ये मुख्यमंत्री फडणवीस कचारगड येथे आले होते. त्यांनी कचारगडच्या विकासाठी शंभर कोटींच्या निधीची घोषणा केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री फगणसिंह कुलस्ते यांनीही निधी देण्याची ग्वाही कचारगड ट्रस्टच्या पदाधिकारी, आदिवासी बांधवांसमक्ष दिली होती. परंतु सहा वर्षात एक रुपया मिळाला नाही.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें