१८७९४ विद्यार्थी बारावी तर १८५९२ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

गोंदिया : शालांत परीक्षा मंडळाच्या वतीने दहावी व बारावीची परीक्षा फेब्रुवारी महिन्यापासून घेण्यात येणार आहे. ११ फेब्रुवारीपासून बारावीची तर २१ फेब्रुवारीपासून दहावीच्या परीक्षेला सुरूवात होणार आहे. यासाठी परीक्षा बोर्डाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातून १८ हजार ७९४ विद्यार्थी इयत्ता बारावीची तर १८ हजार ५९२ विद्यार्थी दहावीच्या परीक्षा देणार आहेत.

कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाची जोरदारी तयारी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीची परिक्षा लवकरच सुरू होणार आहे. फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवड्यातील ११ तारखेपासून बारावीची तर शेवटच्या आठवड्यातील २१ फेब्रुवारीपासून दहावीच्या परिक्षेला सुरुवात होणार आहे. यासाठी परिक्षा मंडळाच्या वतीने शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त वातावरणात परिक्षा घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी एकूण ७८ केंद्राची उभारणी करण्यात येणार असून त्यातून १८ हजार ७९४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर दहावीच्या परिक्षेसाठी जिल्ह्यात ९८ केंद्र तयार करण्यात येणार असून त्यातून १८ हजार ५९२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना येणारा ताण कमी करण्यासाठी व तणावमुक्त परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्याच्या सुचना शालेय शिक्षण विभागाच्यावतीने शाळा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Share