
“बाजारी विकलेली नार” या नाट्यप्रयोगाचे उद्या देवरीत आयोजन
■तरुण पंचशील नाट्यमंडळाचा वतीने नाट्य प्रयोगाचे आयोजन.
देवरी: धडीच्या नावाच्या कुप्रथेखाली मध्यप्रदेशातील शिवपुरी भागात बायकांचा बाजार भरवून भाड्याने बायको विकत घेणाऱ्या सत्य घटनेवर आधारित नाटक, प्रत्यक्ष आपल्या शहरात पाहण्याची संधी आता देवरीवाशीयांना उपलब्ध झाली आहे. ‘चंद्रभागा प्रस्तुत शिवम थिएटर नागभीड-वडसा ग्रुपतर्फे देवरीतील तरुण पंचशील नाट्यमंडळाचा “बाजारी विकलेली नार” अर्थात “भाड्याची बायको” नाटकाचा प्रयोग शनीवार ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ८:०० वाजता पंचशील चौक देवरी येथील समाज मंदिराच्या भव्य आवारात (बंद शामियानात) आयोजित करण्यात आली आहे.
सदर नाटकाचे उद्घाटन या क्षेत्राचे खासदार नामदेवराव किरसान, सह उद्घाटक जि प.सदस्य उषाताई शहारे यांच्या हस्ते आणि या क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेत व देवरीचे नगराध्यक्ष संजूभाऊ उईके यांच्या उपाध्यक्षते खाली पार पडणार आहे. तर दीप प्रज्वलन सेवानिवृत्ती प्राचार्य, के.सी. शहारे सर,व म.भा.प. विद्यालय देवरी चे प्राचार्य जी.एम. मेश्राम सर आणि रंगपूजक देवरीचे उद्योगपती देवराम गुन्नेवार, विजय गहाणे,माजी जि.प.सदस्य रमेश ताराम यांच्या हस्ते होणार आहे.
तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने केले आहे.