
देवरी ग्रामीण रुग्णालयात डायलिसिसची सुविधा
देवरी – सध्या शहरासह तालुक्यातील इतर सर्व भागात सुद्धा किडनी आजाराच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी डायलिसिस केंद्राची व्यवस्था स्थानिक पातळीवर नसल्यामुळे याआधी रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना गोंदिया तथा नागपूर येथे पायपीट करावी लागत असे. परंतू , आमदार संजय पुराम यांच्या प्रयत्नातून देवरी ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस केंद्राची व्यवस्था झाल्यामुळे अखेर सर्व सामान्यसह सर्वच रुग्णांची वेळ व मानसिक त्रासासह खूप मोठी आर्थिक बचत सुद्धा होणार आहे.
मुंबई ते कलकत्ता हायवे क्रमांक सहावरील वसलेल्या देवरी येथे ग्रामीण रुग्णालय असून येथे डायलिसिस केंद्राची व्यवस्था होण्याआधी सध्या सर्वत्र होत असलेल्या किडनी आजाराच्या रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना पायपीट करावी लागत असे. यासाठी अनेक वर्षांपासून नागरिकांची होत असलेली गैरसोय थांबण्यासाठी डायलिसिसची व्यवस्था करण्यासाठी अतिआवश्यक मागणी मागणी वारंवार होत होती. या मागणीची दखल घेऊन आमदार संजय पुराम यांनी आरोग्य मंत्र्यांकडे रितसर पाठपुरावा केला होता. आरोग्यमंत्री आणि आमदार कर्तव्यदक्ष असल्यामुळे अखेर भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालयातील पाच बेड असलेल्या डायलिसिस केंद्राचे रितसर उदघाटन आमदार संजय पुराम यांनी केले.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद संगीडवार, सुखचंद राऊत, जिल्हा सचिव यादोराव पंचमवार, नगराध्यक्ष संजय उईके, तालुकाध्यक्ष प्रविण दहीकर, नगरसेवक आफताब शेख, रितेश अग्रवाल, संजय दरवडे, ॲड. प्रशांत संगीडवार, योगेश ब्राह्मणकर, सोनू चोपकर, माजी सरपंच सीताराम शहारे, हरपाल शहारे, प्रकल्प अधिकारी उमेश काशीद, वैद्यकीय अधिकारी गगन गुप्ता, एच एल एल लाईफ केअर लिमिटेड कंपनीचे जिल्हा समन्वयक अविनाश शहारे, रविना नंदागवळी, विजय येडे, खेमेंद्र देशमुख इतर कर्मचारी वर्ग आणि देवरी तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना आमदार संजय पुराम म्हणाले, २०१४ मध्ये ग्रामीण रुग्णालयाची भव्य इमारत होण्यासाठी कर्तव्य पूर्ण केले. त्यानंतर आता डायलिसिस केंद्र सुरु होण्यासाठी कर्तव्य पूर्ण केले. पुढे एक किंवा दोन वर्षात पुन्हा याच ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी शंभर बेडची व्यवस्था करुन इतर सर्व सुविधांनी युक्त असलेला जिल्ह्यातील असा दुसऱ्या क्रमांकावरील रुग्णालय असेल.
याच दिवशी पुन्हा आदिवासी विद्यार्थी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना अभ्यास करुन उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी ऑनलाईन लायब्ररीचे रितसर उदघाटन आमदार संजय पुराम यांनी केले आहे.